वेंगुर्ले नगरवाचनालयाचे पुरस्कार जाहीर : २२ सप्टेंबरला वितरण

2

वेंगुर्ले.ता,४: वेंगुर्ला येथील नगरवाचनालय या संस्थेतर्फे दिले जाणारे आदर्श शिक्षक / शिक्षिका, आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून प्राप्त पुरस्कारांमध्ये चंद्रकांत सावंत, रामा पोळजी, राजेश घाटवळ या शिक्षकांचा तर मठ-कणकेवाडी नं.३ या शाळेचा समावेश आहे.

नगरवाचनालय ही संस्था गेली ३० वर्षे आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार देण्याचा उपक्रम राबवित आहे. यावर्षीही सदर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा श्री. मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती ‘आदर्श शिक्षक पुरस्कार‘ मठ शाळा नं.२ चे शिक्षक चंद्रकांत तुकाराम सावंत व उभादांडा-नवाबाग शाळेचे शिक्षक रामा वासुदेव पोळजी यांना तर अनिल श्रीकृष्ण सौदागर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा सौ.सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती ‘आदर्श शिक्षक पुरस्कार‘ (माध्यमिक विभाग) अणसूर पाल हायस्कूलचे शिक्षक राजेश प्रभाकर घाटवळ यांना तसेच रामकृष्ण पांडुरंग जोशी यांच्या देणगीतून देण्यात येणारा सौ. गंगाबाई पांडुरंग जोशी स्मृती ‘आदर्श शाळा पुरस्कार‘ मठ येथील कणकेवाडी शाळा नं.२ या शाळेला जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण रविवार दि.२२ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता नगरवाचनालय वेंगुर्ल्याच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

15

4