कोकण रेल्वे मार्ग पुन्हा विस्कळीत

2

नागोठणे ते निडी स्थानकादरम्यान रुळावर आली माती

रत्नागिरी, ता.४ : मध्य रेल्वेच्या नागोठणे ते निडी स्टेशनच्या दरम्यान मार्गावर पुन्हा माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली आहे. दुहेरी मार्गापैकी एकाच मार्गावरून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्वरित हालचाल करून माती दूर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। जोरदार पावसामुळे रेल्वे मार्ग वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडथळे येत आहेत . दरम्यान यामुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.

12

4