मुसळधार पावसामुळे सावंतवाडी बाजारपेठेत “शुकशुकाट”…

2

सावंतवाडी ता.०४: शहरात आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.मुसळधार पावसामुळे ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे.त्यामुळे येथील विक्रेत्यांची अपेक्षेपेक्षा विक्री कमी झाल्यामुळे त्यांचा हिरमोड होत असल्याचे चित्र समोर आले आहे.
आज सकाळपासूनच शहरासह नजीकच्या परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले.याचा परिणाम वाहतुकीसह उद्योग धंद्यावर सुद्धा झाला आहे.गणेश चतुर्थीचा काळ हा उद्योग-व्यवसायासाठी पूरक असतो.या काळात जास्तीत-जास्त व्यवसाय तेजीत असतात.त्यामुळे व्यापारी सुद्धा खुषीत असतात.मात्र यावर्षीच्या गणेशोत्सव काळात पाऊस जास्त असल्यामुळे विक्रेत्यांकडे येणारा ग्राहकांचा ओघ कमी झाला आहे.त्याचेच पडसाद आज शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील बाजारपेठेवर उमटलेले दिसून आले आहेत.

14

4