भक्तांमध्ये नाराजी;पाऊस जावा म्हणून घातले जातंय बाप्पाकडे साकडे…
वेंगुर्ले ता.०४: तालुक्यात पावसाची रिपरिप आजही दिवसभर सुरू आहे. एकूणच गणेशोत्सत्वाच्या तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरू राहिल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
ज्या सणाची प्रत्येकजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे गणेशोत्सव. मात्र या मंगलमय सणावर यावर्षी पावसाची वक्रदृष्टी राहिल्याने सर्वांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पावसाची संततधार दुवसभर सुरुच आहे. त्या मुळे प्रत्येकालाच आपल्या नातेवाईकांकडे जायला अडचणी निर्माण झाल्या असल्याने प्रत्येकजण पाऊस कधी थांबणार या कडे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान या पावसाचा परिणाम भक्तांप्रमाणे व्यापारिवर्गालाही सहन करावा लागत आहे. म्हणूनच सर्वचजण बाप्पा कडे पावसाला थांबव अशी विनंती करताना दिसत आहेत.