Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानवोदय परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या ६ विद्यार्थ्यांची निवड....

नवोदय परीक्षेत बांदा केंद्र शाळेच्या ६ विद्यार्थ्यांची निवड….

बांदा,ता.०२: जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड परीक्षेत बांदा नं.१ केंद्रशाळेतील ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात सर्वेक्षा नितिन ढेकळे, आयुष श्रीप्रसाद बांदेकर, नील नितीन बांदेकर, सान्वी संजय तायवाडे, निधी संतोष मंजिलकर, सिमरन सागर बांदेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल शाळेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्षा संपदा सिध्दये, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये ,बांदा सरपंच प्रियंका नाईक यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी, रसिका मालवणकर, शांताराम असनकर ,रंगनाथ परब, जे.डी.पाटील, जागृती धुरी, मनिषा मोरे, सपना गायकवाड, स्नेहा कदम, सुजाता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments