रेल्वे प्रशासनाची माहिती:अतिवृष्टी व मार्गावर माती पडल्यामुळे निर्णय…
कणकवली ता.०४: मुंबईतील अतिवृष्टीमुळे तसेच
नागोठणे आणि निडी स्टेशन दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर माती आल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यात ४ सप्टेंबर ची 01033 CSMT – रत्नागिरी विशेष आणि 01034 रत्नागिरी पनवेल विशेष आज रद्द करण्यात आल्या आहेत. ५ सप्टेंबर रोजी 0135 पनवेल ते सावंतवाडी विशेष आणि 01036 सावंतवाडी ते CSMT विशेष ह्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत .
आज ता ०४ सप्टेंबर रोजी 50104 रत्नागिरी दादर ही गाडी दिवा स्टेशनपर्यंत धावेल.तर 50103 दादर रत्नागिरी गाडी दिवा स्टेशनवरून सुटेल.असे यात म्हटले आहे.