सावंतवाडीतील घटना; दोन्ही युवकांची पोलिसात धाव, चौकशी सुरू…
साावंतवाडी,ता.०२: किरकोळ कारणावरुन २ युवकात झालेल्या भांडणात रिक्षाच्या काचेवर दगड मारल्याचा प्रकार आज येथे घडला. ही घटना आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समाज मंदिर परिसरा समोर मुंबई-गोवा महामार्गावर घडली.
अपघातग्रस्त रिक्षा रस्त्यातच राहिल्यामुळे दोन्ही बाजूने काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते. या प्रकारानंतर दोन्ही गटांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही गटातील युवकांनी आपण गाडीवर दगड मारला नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे उशिरा पर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरु होती. यातून एकमेकांना मारहाण झाल्याचा दावा दोन्ही युवकांकडून करण्यात आला.