मित्राच्या मदतीला धावला मित्रपरिवार

197
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्लेत रोटरॅक्ट क्लबच्या सदस्यांचा पुढाकार

वेंगुर्ले.ता,४: येथील साकव पूलानजिक राहणारा कु. अवधूत चव्हाण याच्या राहत्या घराचा काही भाग मागील मुसळधार पावसात कोसळला. या परिस्थितीची दखल घेत त्याचे मित्र आणि रोटरॅक्ट क्लबचे सदस्य यांनी त्याला जीवनाश्यक वस्तूंची मदत केली.

यावेळी रोटरॅक्ट वेंगुर्ला मिडटाऊन प्रसिडेंट हेमंत गावडे, व्हाईस प्रेसिडेंट गजानन दोडशनट्टी, आकाश साळकर, निखिल गावडे, लक्ष्मण तलवार, गौरेश वायंगणकर आदी उपस्थित होते. सामाजिक संस्था व दानशून व्यक्तींच्या माध्यमातून चव्हाण कुटुंबियांचे राहते घर सुस्थितीत होण्यासाठी रोटरॅक्ट सहकार्य करणार आहे.