वैभव नाईकांचा आरोप; विनायक राऊत मताधिक्याने निवडून येतील…
कुडाळ,ता.०३: नारायण राणे यांनी दम दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीतून किरण सामंत यांनी माघार घेतली आहे, असा आरोप ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केला. तर काही झाले तरी ठाकरे सेनेचे खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिकाने लोकसभेत निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काल राणे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर रात्री उशिरा किरण सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, राणे यांनी दम भरल्यामुळे किरण सावंत यांनी माघार घेतली. त्यांनी दम भरला हे सर्वांनी पाहिले आहे. मात्र कोकणची जनता आता त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही, काही झाले तरी या ठिकाणी विनायक राऊत हे मोठं मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.