°सेल्फी विथ गणपती बाप्पा” स्पर्धा…

405
2
Google search engine
Google search engine

वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून कुडाळ-मालवण मतदारसंघात अभिनव उपक्रम..

मालवण, ता.०४ : सर्वसामांन्यांचे आमदार म्हणून ओळखले जाणारे आम.वैभव नाईक कुडाळ- मालवण मतदारसंघात विकासकांबरोबरच नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. तरुणाईचं सेल्फीप्रेम लक्षात घेऊन त्यांनी कुडाळ मालवण मतदार संघात एक आगळा वेगळा ‘सेल्फी विथ गणपती बाप्पा’ स्पर्धेचा उपक्रम राबविला आहे. हि स्पर्धा उद्या ५ सप्टेंबर पासून सुरु होत आहे. या स्पर्धेत २१ विजेते क्रमांक निवडले जाणार असून प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल गणेश उत्सवानंतर जाहीर करण्यात येणार आहे.
आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या गणपती बाप्पाबरोबर तरुण तरुणी सेल्फी घेतात गणपती बाप्पाबरोबर तरुणाईचं हे सेल्फीप्रेम लक्षात घेऊन आमदार वैभव नाईक यांनी हि स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ही आगळी वेगळी स्पर्धा होत आहे.
सेल्फी विथ गणपती बाप्पा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ९४२२९७१८७१ या whatsapp नंबर वर गणपती बाप्पा सोबतचा आपला सेल्फी फोटो व स्पर्धकाचे संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पाठवावा,एका व्हाट्सअप नंबर वरून एकच फोटो पाठवावा. स्पर्धकांनी हे फोटो अनंत चतुर्दशी पर्यंत पाठवावेत असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.