राणेंच्या प्रवेशाला आमचा विरोध नाही,तो भाजपचा वैयक्तिक प्रश्न…

2

संजय राऊत: गणेश चतुर्थी नंतर केव्हाही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता…

नाशिक ता ०४: नारायण राणेंना भाजपात घ्यावे की नाही,याबाबत सर्वस्वी निर्णय भाजपने घ्यावा.तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे.त्या मुद्द्यावर आमचा विरोध नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी येथे बोलताना केले.छगन भुजबळांनी “मी आहे तिथे मला काम करू द्या” असे स्वतः म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाबद्दल आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही.गणेशोत्सवानंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्यादृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा घेतला.भाजपने सर्व मतदारसंघात तयारी केली आहे. यावर आमचे लक्ष आहे. आम्हीही सर्व मतदारसंघात तयारी केली आहे. काळजीचे कारण नाही असे खासदार राऊत म्हणाले. नारायण राणेंना भाजपाने घ्यावं की नाही तो त्यांचा विषय आहे त्या मुद्यावर आमचा विरोध नाही असेही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की शिवसेनेमध्ये मुलाखती होत नाहीत, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फक्त बैठका होतात, गणेशोत्सव नंतर कधीही निवडणुका लागतील. राज्यातील राजकारणात सध्या उत्तर महाराष्ट्र केंद्रबिंदू आहे उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा केली आहे असं वक्तव्य केल्याने याबद्दलचे चित्र स्पष्ट आहे. आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही सगळ्यांना पक्षात घायला, आम्ही प्रत्येकाला पारखून घेऊन मगत त्यांना पक्ष प्रवेश देत आहोत भाजप राज्यातील प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांचे मुलाखती घेत आहे तर आम्ही देखील तयारी करत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक मंदीमुळे देशात बेरोजगारी वाढत आहे असे सांगून ते म्हणाले, ही परिस्थती कायम राहीली तर आपल्या देशात रशियासारखी परिस्थिती येऊ शकते हे टाळायचे असेल तातडीने उपाययोजना कराव्यात. आर्थिक मंदी वर सरकारने लवकर उपायोजना कराव्यात काँग्रेसच्या काळात देखील मोठी मंदी आली होती, मात्र मनमोहन सिंह यांनी अत्यंत उत्तम काम करून देशाला मंदीतून बाहेर काढलं, येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटप समान होणार अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं आहे असेही त्यांनी सांगितले.

20

4