राणे लवकरच तिहार जेलमध्ये असतील…

276
2
Google search engine
Google search engine

संजय राऊत; २ महिन्यात आमची सत्ता, ईडी, सीबीआयच्या फायली उघडू…

मुंबई,ता.०५: दोन महिन्यात देशात आमची सत्ता येणार आहे. त्यामुळे नारायण राणे लवकरच तिहार जेलमध्ये दिसतील, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. बंद करण्यात आलेल्या ईडी, सीबीआयच्या फाईल पुन्हा एकदा उघडण्यात येतील. त्यानंतर जेलमध्ये कोण जात हे पाहू, असेही त्यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या सभेत ठाकरे बाप बेटे हे लवकरच जेलमध्ये असतील, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. याला श्री. राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.