शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात…

460
2
Google search engine
Google search engine

विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट; विश्वसनीय माहिती मिळाल्याचा दावा…

मुंबई,ता.०५: शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केला. दरम्यान शिंदे गट गोंधळलेला आहे. त्यामुळे नेमके काय करावे? हे त्यांना कळत नाही. त्यामुळे आता ते परतल्यास नवल नाही, असेही ते म्हणाले. ते मुंबई येथे बोलत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांची कास सोडून शिंदे गटात गेलेले अनेक आमदार गोंधळलेले आहेत. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. याबाबतची विश्वसनीय माहिती आपल्याला एका बड्या नेत्याकडून मिळाली आहे.