Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातिलारी धरणाचे चार दरवाजे मध्यरात्री उघडणार

तिलारी धरणाचे चार दरवाजे मध्यरात्री उघडणार

प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे निर्णय

 

 

दोडामार्ग 
तालुक्यातील तिलारी धरणाचे चारही दरवाजे मध्यरात्रीच्या सुमारास उघडण्यात येणार आहेत.त्यामुळे तालुक्यातील नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिलारी तेरेखोल नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता लांडगे यांनी दिली
ऑगस्ट महिन्यात बसलेल्या पुराच्या तडाख्यातून पूरग्रस्त सावरत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दोडामार्ग, सावंतवाडीत पुरसदृश्य परिस्थिती उदभवण्याची चिन्हे निर्माण झाली असून प्रशासनाने सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोडामार्ग तालुक्यात ठिकठिकाणी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत.
भेडशी येथील कॉजवेवर सकाळपासून पाणी असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.त्यातच जलसंपदा विभागाने पुढील तीन दिवस धरणातील पाणी नदीत सोडण्यात येणार असल्याच्या नोटिसा बजावत स्थानिकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत घरी गणपती बाप्पाची मुर्ती विराजमान असताना घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments