मळगाव घाटीत झाड कोसळले:काही तास वाहतूक ठप्प

2

 

सावंतवाडी ता 5
येथील मळगाव घाटीत झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे सावंतवाडी शिरोडा रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प झाली.
अखेर त्या ठिकाणी जमलेल्या प्रवासी व ग्रामस्थांनी झाड बाजूला केले. हा प्रकार आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्याच्या परिसरात घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मळगाव घाटीतील झाडे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे अपघाताची शक्यता असल्यामुळे ती तोडण्यात यावी अशी मागणी गेले अनेक दिवस तेथील ग्रामस्थांसह प्रवाशांकडून होत आहे मात्र याकडे दुर्लक्ष आहे

1

4