मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्ग अखेर सुरू….

2

मुंबई  : येथील तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकलसेवा आता सुरु झाली आहे. रेल्वेसेवा सुरु झाल्याने रात्री वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर अडकलेले प्रवासी घराकडे रवाना झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पहाटेपासून ब्रेक घेतला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर पहाटे 3.17 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली लोकल अंबरनाथच्या दिशेने रवाना करण्यात आली. त्यानंतर ठरावीक अंतराने कल्याण, कसारा, बदलापूर आणि कर्जतकरिता लोकल रवाना करण्यात आल्या.
मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेसेवादेखील सुरु झाली आहे. सकाळी 5.22 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेना जाणारी लोकल रवाना झाली. त्यापाठोपाठ पनवेलहून सीएसएमटीसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा नेहमीच्या वेळेनुसार सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

14

4