भुईबावडा घाटात सलग दुसऱ्या दिवशी दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

2

 

पावसाची रिपरिप सुरूच; अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत

वैभववाडी/पंकज मोरे

भुईबावडा घाटात बुधवारी पहाटेच्या सुमारास कोसळलेली दरड हटविण्याचे काम सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासून युद्धपातळीवर सुरू आहे. घाटात दाट धुके, पावसाची संततधार यामुळे दरड हटविण्यास सा. बां. ला अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे.
तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने बुधवारी पहाटे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून एक कि. मी. अंतरावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. बुधवारी दुपारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम हाती घेतले. मात्र दगड मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने रस्ता पूर्ण व्यापला आहे. यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्यात आली नव्हती.
दरम्यान गुरूवारी सकाळपासून बांधकाम विभागाने दोन जेसीबींच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची दाट संभावना आहे.

 

0

4