तिलारी धरणाचे चार दरवाजे उघडले…..

2

दोडामार्ग
येथील तिलारी धरणाचे दरवाजे उघडले असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.आज सकाळी सहा वाजता दीड मिटर उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
पाण्याची पातळी समतोल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.मात्र
तिलारी नदी काठच्या गावातील नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी म्हणून सतर्कता बाळगावी व सहकार्य करावे असे आवाहन तिलारी जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल लांडगे यांनी केले आहे.

13

4