राजन तेलींचा घरोघरी गणेश दर्शनावर भर…

280
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विधानसभेची तयारी:पुन्हा एकदा नशीब आजमाविण्याचा प्रयत्न

सावंतवाडी ता.०५: येथील विधानसभा मतदारसंघात भाजपातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.गणेश दर्शनाच्या निमित्ताने हे पदाधिकारी घरोघरी भेट देत आहेत.त्यांच्यासमवेत भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग,अजय सावंत,महेश धुरी,प्रथमेश तेली आदी कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या आहेत.
श्री.तेली हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून भाजपमधून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.मागच्यावेळी दोन नंबरची मते त्यांना मिळाली होती.आता पुन्हा एकदा ते या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे.चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्री.तेलींनी घरगुती गणेश दर्शनाला जास्तीत जास्त महत्त्व दिले आहे.श्री.तेली खुद्द आपल्या घरात गणेश दर्शनासाठी येत असल्यामुळे अनेक ग्रामस्थांकडून समाधानाचे वातावरण आहे.तेली यांनी सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग मतदारसंघातील ग्रामस्थ तसेच कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन आपली उपस्थिती दर्शविली आहे.

\