सह्याद्री फाऊंडेशनच्या वकृत्व व चित्रकला स्पर्धांच्या तारखा जाहीर…

395
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०५: सह्याद्री फाऊंडेशनच्या मान्सून महोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या वकृत्व व चित्रकला स्पर्धा येत्या १४ व १५ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथील देशभक्त शंकरराव गावणकर कॉलेज येथे सकाळी ११:३० वाजता घेण्यात येणार आहेत.
१४ व १५ ऑगस्ट रोजी या स्पर्धा होणार होत्या.पण पूर परिस्थितीमुळे पुढे घेण्याचे ठरले होते.यानुसार १४ सप्टेंबरला वकृत्वस्पर्धा तीन गटात होणार आहे.प्रथम गट तीसरी ते पाचवी विषय छत्रपती शिवाजी महाराज,झाडे लावा झाडे जगवा,चार मिनिटे,दुसरा गट सहावी ते आठवी,शिस्तीचे महत्व,सुदृढ शरीर हाच खरा दागिना,पाच मिनिटे,तिसरा गट नववी ते दहावी स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो मोबाईल आणि इंटरनेट वेळ सहा मिनिटे यापूर्वी ज्यांनी नावे नोंदवली आहेत,त्याने १५ सप्टेंबरला उपस्थित रहावे तसेच नवीन नावे नोंदवायचे आहेत त्यांनी १२ सप्टेंबर पूर्वी सचिव संतोष सावंत 94 23 051530 वर नोंदवावीत तसेच चित्रकला स्पर्धा १५ सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत गावणकर कॉलेज येथे होणार आहेत तीन गटात या स्पर्धा होणार आहेत अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर सावंत 94 22 77 43 41 नावे नोंदवावीत असे आव्हान अध्यक्ष संजू परब व सुनील राव यांनी केले आहे

\