शेवटची सभा…अहो नाही ओ टर्ममधील शेवटची सभा…

254
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शेवटची सभा…अहो नाही ओ
टर्ममधील शेवटची सभा…
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ : जिल्हा नियोजन सभेत भाजपचे राजेंद्र म्हापसेकर हे कोनाळकट्टा येथील बंद असलेल्या बीएसएनएल टॉवरवरुन आक्रमक भूमिका मांडत होते. अनेक संदर्भ देत अधिकारी कसे फसवित आहेत हे पालकमंत्री दीपक केसरकर यांना सांगत असतानाच त्यांनी अचानक ‘अध्यक्ष बघा ही तुमची शेवटची सभा आहे,’ असे विधान केले. त्यावर केसरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘अहो नाही ओ….हा या टर्ममधील शेवटची सभा आहे’ असे सांगितले. यामुळे सभागृहात एकच हसु फुटले. विशेषता सतीश सावंत, रणजीत देसाई यांनी मोठ्याने हसत दाद दिली.
या सभेच्या समारोपाला पालकमंत्री केसरकर यांनी ‘गेल्या पाच वर्षात सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. तसेच अधिकारी व कर्मचारी यांचेही सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त केले.’ याचवेळी त्यांनी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई देण्याचा कार्यक्रम पुढील काही दिवसात घेण्यात येणार आहे. याचा दौरा जाहिर झाल्यावर आपण सदस्यांना कळवू. यावेळी सर्वानी उपस्थित राहावे. यात राजकारण आणू नये. आपल्याला सर्वाना एकत्रित येवून जिल्हा पुढे न्यायचा आहे, असे भावनिक आवाहन सर्वच पक्षाच्या सदस्यांना केले.

\