सात वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ; अन्य ४४ जणांची निर्दोष मुक्तता…
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ : २०११ मध्ये वेंगुर्ले नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान रात्री वेंगुर्ला सुंदरभाटले येथे शिवसेना कार्यालयात तोडफोड करून माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी कणकवलीचे नगराध्यक्ष समिर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश १ प्रकाश कदम यांनी दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३१ हजार ५०० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरित ४४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदेश तायशेटे यांनी काम पाहिले.
याबाबतची हकिगत अशी की, २०११ मध्ये वेंगुर्ला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत ५ डिसेंबर २०११ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मारुती शांताराम साखरे (पोलीस अंगरक्षक) आणि माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर हे वेंगुर्ला सुंदर भाटले येथे शिवसेना कार्यालयात उपस्थित असताना संशयित आरोपी समीर नलावडे, संदेश उर्फ गोट्या सावंत, संजय मालणकर, सुरेंद्र कोदे, संजय कामतेकर, नागेश मोर्ये, मिलिंद मेस्त्री, जावेद शेख, संदेश सावंत, अमित सावंत, उपेंद्र पाटकर, संदीप मेस्त्री, (सर्व रा. कणकवली) तुषार रासम रा. नेरळ कर्जत, सुशांत पांगम, हुसेन मकानदार, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, नारायण गायतोंडे, अक्रम खान, विलास बांदेकर (सर्व रा. बांदा), हेमंत उर्फ काका कुडाळकर, संजय पडते, साईनाथ म्हाडदळकर, आनंद गावडे, सर्फराज नाईक, केशव नारकर, रूपेश पावसकर, गणू उर्फ़ दाजी गोलम (सर्व रा. कुडाळ), मनोज नाईक, दत्ताराम कवठणकर, तौकीर शेख, अतुल पेंढारकर, सश्चिदानंद परब, दत्ताराम सावंत (सर्व रा. सावंतवाडी), विक्रम गावडे, मनीष दळवी, अनंत केळूसकर, आत्माराम सोपटे, गिरजोज फर्नांडिस, प्रसन्ना देसाई, तुषार साळगावकर, विष्णुदास कुबल, संदेश निकम, यशवंत परब, कन्हैया गावडे (सर्व रा. वेंगुर्ला), राकेश परब (मालवण) हे बेकायदेशीररित्या जमावाने हातात लाठ्या काट्या आणि सोड्याच्या बाटल्या घेवून येत उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच कार्यालयातील सहित्याची आणि कार्यालयाबाहेरील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते. यावेळी फिर्यादी यांनी माजी आमदार उपरकर यांचा जिव वाचवा यासाठी सरकारी पिस्तुलातून दोन राउंड फायर केले होते. याबाबतची फिर्याद मारुती साखरे यांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार वरील ४७ जणांवर वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत आरोपी समीर नलावडे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयाने दोषी ठरवत प्रत्येकी भादवी कलम १४३ खाली ३ महीने सक्त मंजूरी व १ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास ५ दिवस साधा कारवास, १४७ व १४८ खाली १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, ४२७ खाली १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, ३३२ खाली १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, ३३६ व ३३७ खाली ३ महीने साधी कैद व ५०० रूपये दंड आणि दंड न भरल्यास २ दिवस जादा कारावास, कलम ३०७ खाली ७ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
संजय मालणकर, सुरेंद्र कोदे, संजय कामतेकर, नागेश मोर्ये, मिलिंद मेस्त्री, जावेद शेख, संदेश सावंत, अमित सावंत, उपेंद्र पाटकर, संदीप मेस्त्री, (सर्व रा. कणकवली) तुषार रासम रा. नेरळ कर्जत, सुशांत पांगम, हुसेन मकानदार, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, नारायण गायतोंडे, अक्रम खान, विलास बांदेकर (सर्व रा. बांदा), हेमंत उर्फ काका कुडाळकर, संजय पडते, साईनाथ म्हाडदळकर, आनंद गावडे, सर्फराज नाईक, केशव नारकर, रूपेश पावसकर, गणू उर्फ़ दाजी गोलम (सर्व रा. कुडाळ), मनोज नाईक, दत्ताराम कवठणकर, तौकीर शेख, अतुल पेंढारकर, सश्चिदानंद परब, दत्ताराम सावंत (सर्व रा. सावंतवाडी), विक्रम गावडे, मनीष दळवी, अनंत केळूसकर, आत्माराम सोपटे, गिरजोज फर्नांडिस, प्रसन्ना देसाई, तुषार साळगावकर, विष्णुदास कुबल, संदेश निकम, यशवंत परब, कन्हैया गावडे (सर्व रा. वेंगुर्ला), राकेश परब (मालवण) सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दरम्यान आज दिवसभर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी होती.
या खटल्याच्या कामी सरकारी पक्षाच्यावतीने प्रथम सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुधीर भणगे यांनी साक्षीदार तपासले तर तत्कालीन सरकारी वकील सूर्यकांत खानोलकर यांनी ॲड. युक्तिवाद केला तर आजच्या दिवशी विद्यमान सरकारी वकील ॲड. संदेश तायशेटेयांनी युक्तीवाद केला.