अन्यथा… पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावू….

2

 

साई कल्याणकर:बांदा टोलनाका पर्यटन केंद्र प्रकरण चिघळण्याची शक्यता

बांदा, ता. ५ : ज्या उद्देशासाठी जागा घेण्यात आली त्या उद्देशाला बाजूला करून बांदा येथील सीमा तपासणी च्या जागेत पर्यटन केंद्र उभारून येथील शेतकऱ्यांचा नुकसान करण्याचा प्रकार पालकमंत्री दीपक केसरकर व संबंधित खात्याचे अधिकारी ठेकेदारांकडून फसवणूक होत आहे ही जागा नको असेल तर संबंधित जमीन मालकांना परत करावी अन्यथा अधिकारी पालकमंत्री व ठेकेदाराच्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागू असा इशारा बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी परिवहन मंत्री परिवहन आयुक्त आदींना आपला निवेदन दिले आहे
निवेदनात म्हटले आहे की टोल नाक्या यासाठी २००८ भूसंपादन करून ३२ एकर जागा घेण्यात आली होती मात्र दरम्यानच्या काळात त्यातील दहा हजार चौरस मीटर जमीन चांदा ते बांदा या योजनेमधून पर्यटन केंद्र उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत एका स्थानिक ठेकेदाराला हाताशी धरून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
या प्रकल्पाला आपला विरोध नाही परंतु ज्या उद्देशासाठी जागा घेतली त्या उद्देशासाठी जागा नको असेल तर ती शेतकऱ्याला परत करणे हा कायदा आहे. परंतु अशा प्रकारे कोणालाही विश्वासात न घेता त्याठिकाणी पर्यटन केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा सर्व प्रकार चुकीचा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होणार आहे. याबाबत हरित लवादाकडे यापूर्वीच दावा चालू आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान करणारा आहे.असा आरोप करीत यावर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तात्काळ योग्य तो तोडगा काढावा अन्यथा आपण त्यांच्यासह अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा कल्याणकर यांनी दिला आहे.

15

4