वैभव नाईक: कुडाळ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांचे कौतुक…
कुडाळ,शासकीय अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर मंत्रालयातील टाचणी सुद्धा सापडू शकते. परंतु दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला तर हत्ती सुद्धा सापडणार नाही असा टोला आमदार वैभव नाईक यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात मारला.
कुडाळ तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम चांगल्या पद्धतीने काम करत आहे.त्याचा फायदा येथील स्थानिक शेतकऱ्यांना होत आहे अशाच प्रकारे त्यांनी आपले कार्य लोकांसाठी सुरू ठेवावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चांदा ते बांदा यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कृषी अवजारांचे लोकार्पण आज श्री नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गोठोस येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नाईक म्हणाले शेतकरी सक्षम करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरते कुडाळ तालुक्यातील अअधिकाऱ्यांनी तशा पद्धतीने काम केले आहे त्यामुळे तीन वर्षात १०००च्या वर सहा कोटी रुपयांची अवजारे वाटप करण्याचा मान या तालुक्याला मिळाला.चांदा ते बांदा योजनेतून रब्बी हंगामात अडीच पट क्षेत्र वाढण्यास मदत झाली.श्री पद्धत यशस्वी झाली. त्यामुळे ७६ किलो भाताचे लक्ष गाठले आहे त्याचा फायदा आता येथील शेतकऱ्यांनी घ्यावा.
यावेळी तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे ,कृषी पर्यवेक्षक रत्नदीप कावले ,अमोल करंदीकर, निलेश उगवेकर, कृषी सहाय्यक धनंजय कदम, कृषी अधिकाऱ्यांची टीम उपस्थित होती. तसेच कार्यक्रमाला उपस्थिती पंचायत समिती सभापती राजन जाधव ,पंचायत समिती उपसभापती श्रेया परब, जिल्हा परिषद सदस्य राजेश कविटकर, गोठोस गावचे सरपंच सौ सानिका डीगे. संतोष बांदेकर, प्रभाकर गोठोस्कर ,महादेव नाईक, विष्णू तांमणेकर, प्रकाश कदम ,शंकर नाईक , आदी उपस्थित होते.