रमजान ईदच्या शुभेच्छा देत नाईक कुटुंबीयांशी साधला संवाद…
कणकवली,ता.११: रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची कणकवलीतील निवासस्थानी सहकुटुंब भेट घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाईक कुटुंबीयांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नाईक कुटुंबीयांसोबत राणेंनी शिरकुर्माचा आस्वाद घेतला.
यावेळी राणे यांच्या पत्नी नीलम राणे व चिरंजीव आमदार नितेश राणे उपस्थित होते. अबिद नाईक यांनी मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य ॲड. सावळाराम अणावकर, नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, बंधू आसिफ नाईक, अनिस नाईक, हुमेरा नाईक, नजमा नाईक, इकरा नाईक, रिजा नाईक, मेहक नाईक, अली नाईक, गणेश चौगुले, अमित केतकर, निशिकांत कडुलकर, इम्रान शेख, मुकुंद वर्णे, केदार खोत आदी उपस्थित होते.