Wednesday, July 9, 2025
Google search engine
HomeUncategorizedमाजगावच्या प्रसिद्ध मामा-भाच्याच्या गणपतीचे अर्चना घारेंनी घेतले दर्शन...

माजगावच्या प्रसिद्ध मामा-भाच्याच्या गणपतीचे अर्चना घारेंनी घेतले दर्शन…

तब्बल 45 कुटुंब एकत्र येऊन जपतात अनोखी परंपरा…

सावंतवाडी ता.०6:मामा-भाच्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजगाव येथील सावंत कुटुंबीयांच्या गणपतीला राष्ट्रवादीच्या सावंतवाडी मतदार संघाच्या पक्षनिरीक्षका अर्चना घारे यांनी भेट दिली.यावेळी 45 कुटुंब दरवर्षी न चुकता एकत्र येऊन दोन गणपती बसवतात या प्रथेचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलताना सौ.घारे म्हणाल्या, कोकणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते तो सण म्हणजे गणेशोत्सव.या सणात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने बाप्पांची सेवा चालू असते.आज अशाच भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या एका कुटूंबाच्या बाप्पांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली.
माजगावचे सरपंच दिनेश सावंत यांचा 45 कुटुंबाचा मिळून एकच गणपती बसविला जातो,त्यांचं मनोभावे पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली जाते.गणेशोत्सव साजरा करण्यामागची मूळ प्रेरणा ही समाजाला एकत्र आणून एकतेची भावना निर्माण करणे,सामूहिक एकजुटीने अडीअडचणींना सामोरे जाणे, आपल्यातली संघटन शक्ती ओळखून त्याचा समाजासाठी उपयोग करणे ही होती. सावंत आणि इतर कुटुंबीय याच प्रेरणेने गेल्या अनेक वर्षांपासून एकदिलाने गणेशोत्सव साजरा करतात. आज मला या उत्सवाचा भाग होता आले हे मी माझे भाग्य समजते अशी भावना अर्चना घरे परब यांनी व्यक्त केली
यावेळी माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रेश्मा सावंत, आबा सावंत, सतीश नाईक, नाईक सर, चराठेचे सरपंच रघुनाथ वाळके, मेस्त्री कुटूंब, गावडे कुटुंब, सावंत कुटुंब उपस्थित होते. सर्वांना सुखी आणि समृद्ध ठेवण्याची प्रार्थना गणरायाकडे केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments