प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश निश्चित…

183
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ.प्रविण सानये;तांबळडेग शिक्षणोउत्कर्ष संस्थेच्या कार्यक्रमात प्रतिपादन. .

देवगड ता,०६: मळलेल्या वाटेवर कधीही समृद्धी नसते,आपण स्वतःची वाट स्वतः निर्माण केली पाहिजे,जीवनात अपयश आले म्हणून खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न केले,की यश नक्कीच सापडत,नोकरी आपल्या लायकीची बनत नाही आपण नोकरीच्या लायकीचे बनलो पाहिजे असे,प्रतिपादन डॉ.प्रविण तुकाराम सनये यांनी केले.तांबळडेग शिक्षणोउत्कर्ष संस्थेच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते,
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा शैक्षणीक दर्जा वाढावा या हेतूने संस्थेचे प्रयत्न चालू आहेत,विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी आत्मसात करावी, यश मिळविण्यासाठी मेहनतीने व प्रामाणिकपणे प्रयत्न करा,असे प्रतिपादन तांबळडेग शिक्षणोउत्कर्ष संस्था अध्यक्ष विलास कुबल यांनी केले.
तांबळडेग शिक्षणोउत्कर्ष
संस्थेच्या वतीने बुधवारी गावांतील पहिली ते बारावी,पदवीधर व विविध परीक्षा गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सांस्कृतिक भवन येथे डॉ प्रवीण सनये यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाला.
या वेळी पत्रकार विष्णू धावडे, पत्रकार प्रमोद कांदळगावकर,दाजी राजम आदींची भाषणे झाली,सूत्रसंचालन
तांबळडेग शिक्षणोउत्कर्ष
संस्था सचिव निलेश सादये यांनी केले, या दरम्यान मंचकावर डॉ प्रवीण सनये,तांबळडेग शिक्षणोउत्कर्ष
संस्था अध्यक्ष विलास कुबल,मुक्तद्वार सागर वाचनालय अध्यक्ष चंद्रकांत चोपडेकर,तांबळडेग ग्रामसेवा अध्यक्ष नाना मोंडकर,सचिव हरींचंद्र कोचरेकर,गणपत सादये,
पुंडलीक येरागी,काका मुणगेकर, दिगंबर येरागी,देवानंद केळुसकर,सुनील कोचरेकर,दत्तविजय कुबल,सौ सनये,आदी सह गावांतील विध्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते,

\