कुर्ली-फोंडा एसटी बस कलंडली…

2

सुदैवाने मोठा अनर्थ टळला ; सर्व प्रवासी सुखरूप…

वैभववाडी, ता. ६ : कुर्ली-फोंडा मार्गावरील घोणसरी सुतारवाडी नजीक रस्त्याच्या बाजूला फोंडा-कुर्ली एस. टी. बस कलंडली. मात्र या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ही घटना आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
फोंड्याहून दुपारी १ वाजता सुटणारी देवगड डेपोची तांबळडेग फोंडा-कुर्ली गाडी नं एम एच १४ बी टी ४२६३ ही बस शुक्रवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घोणसरी सुतारवाडी नजीक समोरून येणाऱ्या मोटारसायकला बाजू देतांना एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एस. टी. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जावून धडकली. मात्र या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
आज गौरी पूजन असल्यामुळे बहुतेक लोक फोंडाघाट येथे बाजारसाठी गेले होते. बाजार करून दुपारी घरी परतत असताना एस. टी. ला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कुर्ली येथील अगस्त्य डेरी फार्मचे मालक दशरथ पाटील यांनी आपला टेम्पो चालक विनोद पवार यांना घेऊन घटनास्थळी पाठविला. वाटेत अडकलेल्या २५ ते ३० प्रवाशांना टेम्पोतून घरी सोडले. दरम्यान दुपारी एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.

0

4