गुंतवणूकदारांची फसवणूक; सोनू परब याला जामीन…

240
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.०६: गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी वर्षभर न्यायालयीन कोठडीत असलेल्या भांडुप येथील सोनू सदाशिव परब यांची आज मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस हजाराच्या जामिनावर मुक्तता केली जादा रकमेचे आम्ही दाखवून त्याने अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती.
कुडाळ येथे स्वामी समर्थ इंटरप्राईजेस नावाची वित्तीय संस्था स्थापन करून जादा रक्कम परत देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून ठेवी गोळा करण्यात आल्या होत्या. यात रतन नांदोसकर, सचिन नांदोसकर, दिनेश नांदोसकर, सोनू परब, सुप्रिया मेहता यांचा समावेश होता. यात शेअर मार्केटिंग प्रशिक्षण नावाखाली दोन लाख रुपये गुंतवल्यास ते १५ महिन्यानंतर ते परत केले जातील. दरम्यान त्याबद्दल एक लॅपटॉप, तीन महिन्यांचे प्रशिक्षण आणि ते पूर्ण झाल्यानंतर बारा वर्षापर्यंत दरमहा १५ हजार रुपये देण्याचे सांगण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेक लोकांनी यात गुंतवणूक केली होती. मात्र काहींचे पैसे परत देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने सन २०१५ ते जून २०१८ या कालावधीत या व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार ऑगस्ट २०१८ रोजी पोलिसात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी सोनू परब याला १० ऑगस्ट २०१८ रोजी अटक झाली होती. जिल्हा विशेष न्यायालयात पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर सोनू परब याने जिल्हा विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे तो अद्यापही न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.तो मंजूर झाला असल्याची माहिती वकील अमोल सामंत यांनी दिली.आरोपीच्या वतीने वकील अभय खंडेपारकर यांनी काम पाहिले. तर वकील अमोल सामंत यांनी त्यांना सहाय्य केले.

\