आंबोली-बाजारवाडी येथील ५२ वर्षीय गृहस्थ बेपत्ता…

180
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

सावंतवाडी,ता.१४: आंबोली-बाजारवाडी येथील सुहास शशिकांत भिसे ( वय ५२ ) हे गृहस्थ १० एप्रिलपासून बेपत्ता आहेत. घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याबाबतची तक्रार त्यांचे भाऊ किशोर शशिकांत भिसे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात केली असून शोध कार्य सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुहास भिसे हे मानसिक दृष्ट्या मतिमंद असल्याने कुटुंबीयांकडून त्यांचा सांभाळ केला जातो, या अगोदर देखील ते अनेक वेळा घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते मात्र, पोलिसांच्या मदतीतून त्यांना शोधण्यात आले होते. १० एप्रिल पासून ते बेपत्ता आहेत, ते बेळगावच्या दिशेने जाताना त्यांचा भाऊ किशोर भिसे यांच्या मित्राला दिसले होते. दरम्यान बेपत्ता सुहास भिसे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास सावंतवाडी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

\