तात्काळ आदेश मागे घ्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
मुंबई ता.०६: हॉटेल तसेच समारंभासाठी गड-किल्ले भाड्याला देण्याचे आदेश शासनाकडून काढल्यानंतर काही तासातच या आदेशाला छत्रपती संभाजी राजेंनी आपला आक्षेप नोंदवला आहे.काही झाले तरी आपण हा प्रकार खपवून घेणार नाही.चुकीच्या पद्धतीने काढलेला आदेश मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
राज्यातील २५ गड-किल्ले लग्न समारंभ तसेच हॉटेलसाठी वापरण्यात यावेत त्यासाठी आवश्यक असल्यास ते भाड्याला देण्यात यावे,असा निर्णय शासनाने घेतला होता.याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले होते.त्या वृत्तानंतर जोरदार खळबळ माजली.अनेकांनी त्याला विरोध केला.या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी राजांनी सुद्धा या आदेशाला विरोध केला आहे.यात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश मागे घ्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे.