चालत्या दुचाकीवर वीज खांब कोसळला, सुदैवाने चालक बचावला..

1184
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माजगाव येथील घटना; वीज अधिकाऱ्यांच्या विरोधात अजय सावंतांची नाराजी…

 

सावंतवाडी,ता.१५: चालत्या दुचाकीवर विजेचा खांब कोसळल्याची घटना आज माजगाव येथे घडली. यात कालेली येथील युवक सुदैवाने बचावला आहे. दत्तात्रय परब असे त्याचे नाव आहे.

ही घटना साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर हॉटेल माटव परिसरात घडली. तो किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दत्तात्रय हा दुचाकीने कामासाठी गोव्यात जात होता. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी तो खांबाखाली अडकला. त्या ठिकाणी असलेल्या प्रवासी व नागरिकांनी त्याला बाहेर काढून अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र याबाबतची माहिती देण्यासाठी वीज अधिकाऱ्यांना संपर्क केला असता कोणीच फोन उचलला नाही. त्यामुळे भाजपाचे युवा नेते अजय सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.

\