दुचाकी अपघातातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू… 

1131
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावरवाड येथे घडली घटना : दुचाकी खड्ड्यात गेल्याने झाला अपघात…

मालवण, ता. १५ : मालवण कसाल मार्गांवरील सावरवाड तिठा परिसरात दुचाकी खड्ड्यात गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गीता उमेश हिर्लेकर (वय- ५०) रा. वराड घाडेवळवाडी या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या. ही घटना काल सायंकाळी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने गोवा बांबुळी येथे दाखल केले होते. मात्र उपचारा दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गीता हिर्लेकर या त्यांच्या नातेवाईकांच्या दुचाकीवरून कसालच्या दिशेन जात असताना हा अपघात घडला. गीता यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

अपघात झाला त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तरी याबाबत प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत खड्डे बुजवावेत अशी मागणी भाजप वराड शक्तीकेंद्र प्रमुख राजन माणगावकर व ग्रामस्थांनी केली आहे.

\