इन्सुली येथे भाजी वाहतूक करणार्‍या टेम्पोला अपघात…

734
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१६: झोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून भाजी व फळांची वाहतूक करणारा टेम्पो थेट इन्सुली येथे रस्त्यालगतच्या शेड मध्ये पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला दुखापत झाली नाही. हा अपघात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली चर्च समोर झाला. याबाबतची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विकी केरकर यांनी दिली.

अपघातग्रस्त टेम्पो चालक कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने भाजी व फळांची वाहतूक करत होता. इन्सुली चर्च समोर जोसेफ होलिक्रोस गॅरेजची शेड आहे. चालकाला झोप अनावर झाल्याने टेम्पोची शेडला जोरदार धडक बसली. या धडकेत टेम्पो पलटी झाल्याने शेड पूर्णपणे कोसळली.

\