असंरक्षित किल्ल्यांचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्याचा निर्णय…

2

जयकुमार रावल; किल्ले भाड्याने देण्याचा प्रश्नच येत नाही…

मुंबई ता.०६: संरक्षित वर्गवारीत येणाऱ्या वर्ग दोनच्या किल्ल्यांचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळ म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे.त्यामुळे किल्ले लग्नासाठी व समारंभासाठी भाडयाने देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
राज्यातील गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू आहे.असे वृत्त एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते.त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात छत्रपती संभाजीराजे यांनी आक्षेप नोंदवला होता.तसेच शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली.शासनाच्यावतीने श्री.रावल यांनी भूमिका मांडली आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की,राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत वर्ग १ आणि वर्ग २ मध्ये ते विभागले जातात.शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंध असलेले किल्ले हे वर्ग १ मध्ये तर अन्य सुमारे तीनशे किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात त्यातील असंरक्षित असलेल्या किल्ल्यांचा पर्यटनदृष्ट्या ऐतिहासिक स्थळ म्हणून विकास व्हावा म्हणून हा राज्य सरकार तर्फे निर्णय घेण्यात आला आहे.त्यात भाड्याने किल्ले देण्याचा विषय येत नाही.

10

4