मांडुकलीत पाणी भरले; गगनबावडा-कोल्हापूर मार्ग ठप्प

281
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक ठप्प; वाहतूक फोंडामार्गे वळविली

वैभववाडी/पंकज मोरे

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसापासून पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. शुक्रवारी मुसळधार झालेल्या पावसाने गगनबावडा तालुक्यातील मांडुकलीत पाणी भरल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडामार्गे वळविण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पावसाने जोरदार बॕटींग केल्याने तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकलीत रस्त्यावर पाणी आले आहे.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. मालवाहतूक करणाऱ्या गाड्या गगनबावडा येथे थांबविण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा मार्ग पाण्याखालीच राहणार आहे.
वैभववाडी येथे पोलिसांनी बॕरिकेट्स लावून फोंडाघाट मार्गे वाहतूक वळविली आहे. पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

\