कुडाळातील बैठकीत नाराजी; सामंतांचे आदेश येईपर्यंत काम करणार नाही…
कुडाळ,ता.१८: भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नेहमी दुय्यम वागणूक देण्यात येते. त्यामुळे जोपर्यंत किरण सामंत आदेश देत नाहीत तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका आज येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घेतली. दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन मधून १० टक्के निधी दिला जाईल, असा शब्द पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. मात्र तो पाळला गेला नाही. तसेच विविध समित्यांची निवड करत असताना शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे पुढे महायुतीचा धर्म पाळला जाणार का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. कुडाळ येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा आज या ठिकाणी पार पडली. यावेळी माहितीसाठी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या मनाने माघार घेणाऱ्या किरण सामंत यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, युवासेना तालुकाप्रमुख प्रसाद नार्वेकर, शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडुलकर, शिवसेना उपतालुका संघटक संजय सावंत, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत, शिवसेना महिला आघाडी उपतालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, महिला आघाडी उपविभागप्रमुख शिल्पा आचरेकर, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ गुरव, विभागप्रमुख जयदीप तुळसकर, चंद्रकांत राणे, प्रवीण मर्गज, पांडुरंग राणे, राजेश तेंडुलकर, महेंद्र सातार्डेकर, राजेश तेंडुलकर, किशोर सावंत, विठोबा शेडगे, उपविभागप्रमुख रामकृष्ण गडकरी, अंकित नार्वेकर, विठ्ठल शिंदे, पुंडलिक जोशी, रामचंद्र परब, आदित्य राणे, दर्शन इब्रामपुरकर, सीताराम कदम, रुपेश नाईक, बुथप्रमुख, शिवदूत उपास्थित होते.