अंगावर भिंत कोसळून होडावडेत वृद्ध महीला ठार

428
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.6
घराची भिंत अंगावर कोसळल्यामुळे होडावडे जाधव वाडी येथील वृद्ध महिला जागीच ठार झाले ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली सुभद्रा सिताराम पावसकर वय 72 असे तिचे नाव आहे याबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा अर्जुन पावसकर हा बाजूच्या खोलीत आराम करत असताना हा प्रकार घडला. त्यामुळे या अपघातातून तो सुदैवाने बचावला आहे.
या घटनेची खबर वेंगुर्ले पोलिसांना तसेच नैसर्गिक आपत्ती केंद्र वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय दिली असून वेंगुर्ले पोलीस उपनिरीक्षक व्ही.बी. पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव पोलीस पोलीस कर्मचारी नितीन चोडणकर आणि पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा केला आहे अधिक तपास तुळस बिटचे ठाणे अंमलदार तुकाराम जाधव करीत आहेत

\