राणेंच्या प्रवेशाच्या तारखा म्हणजे ‘लांडगा आला रे आला’…

2

 

विनायक राऊतांचा टोला ; भाजपाला पहिली युती महत्त्वाची आहे

मालवण, ता. ६ : नारायण राणेंकडून
प्रवेशाबाबत केवळ तारखाच दिल्या जात आहेत.आता त्यांची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीसारखी झाली आहे.अशी टोला खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.
भाजपला पहिल्यांदा युती महत्वाची आहे.मात्र भाजपकडून अद्याप त्यांना प्रवेश दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे तेच प्रवेशाच्या बातम्या, तारखा प्रसारमाध्यमांना पुरवित आहेत.अशी टिका सुध्दा यावेळी राऊत यांनी केली
गणेशोत्सवानिमित्त तळगाव येथील निवासस्थानी आलेल्या खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रसाद मोरजकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेसाठी नारायण राणे हा विषय कधीच संपलाय. यामुळे त्यांच्या प्रवेशावर आम्हाला काहीही बोलायचे नाही. तो भाजपचा विषय आहे. आम्ही फक्त युतीच्या अंतीम निर्णयाकडे पाहत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्यावेळीच विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय झाला आहे. आता मित्र पक्षांना जागा सोडून इतर जागांवरील निर्णयही लवकरच होईल. शिवसेनेला गृहित धरून उमेदवारीचा आकडा दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यात शिवसेनेमध्ये विद्यमान आमदारांचा पक्षप्रवेश मोठ्या संख्येने झाला आहे. यामुळे या ठिकाणी पुन्हा त्या आमदारांना संधी देण्याचा निर्णय पक्षप्रमुख घेतील. युतीच्या निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो घेतील तो सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील सर्वच्या सर्व जागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्‍वासही खास. राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेनेने नारायण राणेंची हकालपट्टी केल्यानंतर जिल्ह्यात ज्या पद्धतीने राणे समर्थकांनी हैदोस घातला. त्यावर काल न्यायालयाने दिलेल्या निकालाने दहशत माजविणार्‍यांना चांगलाच धडा मिळाला आहे. आता कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना तत्काळ पदावरून हटविण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, जेणेकरून भविष्यात अशाप्रकारे राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होणार नाही. न्यायालयाने दिलेला निकाल हा जिल्ह्यातील राजकीय दहशतीविरोधातील असल्याचे राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या बागायतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महसूल, कृषी विभागाने फेर सर्वेक्षण करून शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. शिवाय पालकमंत्र्यांशी चर्चा करून प्रशासनास तशाप्रकारचे आदेश देण्यास सांगितले आहे. जेणेकरून शेतकर्‍यांना शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देता येईल असेही श्री. राऊत यांनी सांगितले.

8

4