वेंगुर्ले : ता.६
रत्नागिरीचे आमदार तसेच म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हे वेंगुर्ला दौ-यावर आले असता येथील शिवसेना पदाधिका-यांच्या गणपतीचे तसेच गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेत संवाद साधला.
गणेश चतुर्थी सणानिमित्त आमदार उदय सामंत हे वेंगुर्ला-भटवाडी येथील आपल्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी आपल्या घराच्या गणपतीची पूजा-अर्चा केली. त्यानंतर दक्षता समितीचे अध्यक्ष व म्हाडाचे सदस्य सचिन वालावलकर, वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्या निवासस्थानी जाऊनी गणपतीचे दर्शन घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच गाडीअड्डा येथील तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणपतीचेही आमदार सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी गणपती उत्सव मंडळाचे बिचू नार्वेकर, अमित म्हापणकर, पपू चेंदवणकर, सुयोग चेंदवणकर, बापू केळजी, केतन केळजी, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, शिवसैनिक अजित राऊळ यांनी त्यांचे स्वागत केले.