गगनबावडा कोल्हापूर मार्ग पूर्ववत..

2

 

मांडुकलीत भरलेले पाणी ओसरले; पहाटेपासून वाहतूक पूर्ववत

वैभववाडी/पंकज मोरे

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसापासून थैमान घातलेल्या पावसाने अक्षरशः जनजिवन विस्कळीत केले. शुक्रवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यातील मांडुकली येथे रस्त्यावर पूराचे पाणी आल्याने कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने मांडुकलीत रस्त्यावर आलेले पूराचे पाणी ओसरले आहे. दरम्यान शनिवारी पहाटेपासून गगनबावडा कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने शुक्रवारी सायंकाळी मांडुकलीत रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. मध्यरात्री नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने मांडुकलीत रस्त्यावर भरलेले पूराचे पाणी ओसरले आहे. शनिवारी पहाटेपासून गगनबावडा कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

14

4