तो अपघात चारचाकी वाहनामुळेच…

241
2
Google search engine
Google search engine

 

वाहनचालकाने दिली कबुली ; तडजोडीने प्रकरण मिटविले…

मालवण, ता. ७ :

कुंभारमाठ येथे बुलेट व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातास चारचाकी वाहनचालकच जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधिताने आपली चूक कबूल करत हे प्रकरण तडजोडीने मिटविले.
मालवणहून चिपीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनास बुलेटस्वाराने धडक दिल्याची घटना काल दुपारी कुंभारमाठ सागरी महामार्ग रस्त्यावर घडली होती. यात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुलेटस्वाराने चारचाकी वाहनास धडक दिल्याची माहिती मिळाली होती. प्रत्यक्षात हे प्रकरण सायंकाळी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित पर्यटकांच्या चारचाकी वाहनचालकाने आपण मॅप लावून गाडी चालवीत होतो. चिपीच्या दिशेने जाणारा मार्ग दिसल्याने आपण गाडीचा वेग कमी केला. मात्र याच दरम्यान समोरून येणारा बुलेटस्वाराकडे लक्ष न गेल्याने गाडी वळवित असताना त्याची आपल्याला धडक बसल्याचे स्पष्ट केले. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले होते. अखेर हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले.