ऐनारी येथे घर कोसळले

2

सुदैवाने जिवीतहानी टळली; घराचे मोठे नुकसान

वैभववाडी.ता,७: तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने ऐनारी गावठण येथील आत्माराम लुकाजी पांचाळ यांचे घर कोसळले आहे. सुदैवाने यापूर्वीच घरातील कुटुंब स्थलांतरीत झाल्याने जिवीतहानी टळली आहे.
तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला आहे. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने ऐनारी गावठण येथील आत्माराम लुकाजी पांचाळ यांचे घर कोसळले. सुदैवाने या घरातील कुटुंब यापूर्वीच स्थलांतरीत झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या आपत्तीत घराचे मोठे नुकसान झाले आहे.

फोटो- ऐनारी येथे कोसळलेले घर

23

4