करुळ घाटात दरड कोसळली

235
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वाहतूक ठप्प; पावसाची रिपरिप सुरु

वैभववाडी.ता,७: करुळ घाटातील दरडी कोसळण्याचे विघ्न टळता टळेना. शनिवारी सकाळपासून संततधार कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान दुपारी वैभववाडी पोलिस आणि बांधकामचे कर्मचारी करुळ घाटात रवाना झाले आहे.
शनिवारी सकाळी संततधार कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान दुपारी वैभववाडी पोलिस व सा. बां. चे कर्मचारी घाटात रवाना झाले आहेत. करुळ घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र चाकरमान्यांना घाट मार्गात कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग घेत आहे.

\