कुर्लीत घरावर वीज पोल उन्मळून कोसळला

2

सुदैवाने मोठा अनर्थ टळला; वीज पुरवठा खंडित

वैभववाडी.ता,७: कुर्ली खडकदारा येथील मानाजी शेळके यांच्या घराजवळील जीर्ण विद्युत पोल घरावर उन्मळून कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या वाडीतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
सदर वीज पोलचे काम १९८९ मध्ये करण्यात आले आहे. तेंव्हापासून वीज पोल व विद्युत लाईन धोकादायक बनल्या आहेत. मात्र वीज वितरणने याकडे लक्ष दिले नाही. कुर्ली गावात अनेक विद्युत पोल जीर्ण झाले आहेत. कोणत्याही क्षणी विद्युत पोल उन्मळून जिवीतहानी होवू शकते. मात्र वीज वितरण जिवीतहानीची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत प्रशासनाला निवेदन देवूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. तरी वीज वितरणने मोडकळीस आलेले विद्युत पोल नवीन बसवून देण्यात यावे. अशी मागणी अॕड. गणेश शेळके यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

0

4