करुळ घाटात एकेरी वाहतूक सुरू…

2

ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत; पावसाचा जोर कायम

वैभववाडी/पंकज मोरे तालुक्यात सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शनिवारी दुपारी पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात मोठी दरड कोसळली. यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प होवून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान वैभववाडी पोलिस, बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.
तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने धुमशान घातले आहे. शनिवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने करुळ घाटात मोठी दरड कोसळली. यामुळे या मार्गावरील काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान दुपारी सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला हटवून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

7

4