गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय वेदनादायी…

376
2
Google search engine
Google search engine

सागर नाणोस्कर; अशा निर्णया विरोधात शिवप्रेमींनी एकत्र यावे…

सावंतवाडी ता.०७: राज्यातील गड-किल्ले भाड्याने देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा शिवप्रेमींना वेदनादायी ठरणार आहे.अशा या निर्णयाचा आम्ही निषेध करत असून,राज्य शासनाने यावर पुनर्विचार करावा अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते तथा शिवप्रेमी सागर नाणोस्कर यांनी मांडली आहे.अशा या शासनाच्या मनमानी विरोधात जिल्ह्यातील युवकांसह राज्यातील सर्वच शिवप्रेमींनी आता एकत्र येण्याची गरज आहे,अन्यथा भविष्यात याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागते असेही त्यांनी म्हटले आहे.
गड किल्ले लग्नसमारंभासाठी तसेच हॉटेल साठी भाड्याने देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.सरसकट हे किल्ले न देता वर्ग २ चे असंरक्षित किल्ले यासाठी निवडण्यात आल्याचे पर्यटन मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.तरी या निर्णयाविरोधात शिवप्रेमी कडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.या पार्श्वभूमीवर श्री नाणोस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.