सहा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप

2

वैभववाडी.ता,७: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ चा जयघोष, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत अभिर गुलालांची उधळण करीत तालुक्यात शनिवारी सायंकाळी सहा दिवसांच्या गणरायांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
कोकणात सर्वच ठिकाणी घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. कोकण वासियांचा हा मोठा उत्सव सर्वच ठिकाणी आनंदात साजरा केला जातो. दीड, पाच, सात, नऊ, अकरा आणि एकवीस दिवस ठेवून गणेशाचे मनोभावे पूजन केले जाते. व त्यानंतर गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात येतो.या वर्षी २ सप्टेंबरला घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी भव्य मिरवणूकीने गणरायाचे आगमन झाले. या गणेशोत्सवाला सहा दिवस पूर्ण झाले. या सहा दिवसांच्या गणरायांना भव्य मिरवणूकीने भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.

_फोटो- भुईबावडा(पहिलीवाडी) येथील नदीत सहा दिवसांच्या गणरायांचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले.छाया- पंकज मोरे_

1

4