शिवसेनेच्या ग्राहक कक्षाच्या शहरप्रमुखपदी प्रकाश बीद्रे यांची निवड…

2

सावंतवाडी ता.०७: शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या सावंतवाडी शहरप्रमुखपदी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख डॉ.प्रविण सावंत यांनी जाहिर केली.
शिवसेनेची अधीकृत संघटना असलेली,रौप्य मोहोत्सवी वर्ष पूर्ण करणारी,गेली २५ वर्ष ग्राहक आणी सर्व सर्वसामान्य जनतेची प्रश्न आक्रमक पणे मांडून सोडवण्या साठी प्रयत्न करणारी संघठन म्हणून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाकडुन काम करण्यात येते.
यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राउळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,ऋची विनायक राऊत,महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावले,प्रशांत कोठावले,संजय माजगावकर आदी उपस्थित होते.

37

4