निमित्त गणेश चतुर्थीचे, शिवसेनेतील “यंग ब्रिगेड” मतदारांच्या घरोघरी…

2

रुची राऊतांचे नेतृत्व;आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला होणार फायदा…

सावंतवाडी ता.०७: गणेश चतुर्थीचे औचित्यसाधून
खासदार विनायक राऊत यांच्या सुकन्या रुची राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे “यंग ब्रिगेड” गणेश दर्शनासाठी घरोघरी फिरताना दिसत आहे.गेल्या काही वर्षात अशाप्रकारे नव्याने युवकांची फळी शिवसेनेत काहीशी कमी होती,परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र वेगळी फळी तयार होताना दिसत आहे.
गणेश दर्शनाच्या निमित्ताने लोकसभा खासदार विनायक राऊत यांनी मतदार संघातील घरोघरी गणेश दर्शनासाठी शक्य नसल्यामुळे आपली जबाबदारी आपल्या सुकन्या रुची यांच्यावर सोपवली आहे.सर्वसामान्यांचा घरात पोहोचून शिवसेनेच्या खासदार कशा प्रकारे असू शकतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर रुची जरी मतदारसंघात फिरत असल्या तरी त्यांच्यासमवेत शिवसेनेची तरुण पिढी घरोघरी फिरताना दिसत आहे.
यात विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, महिला संघटक जानवी सावंत, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत, ग्राहक सेल जिल्हा प्रमुख प्रवीण सावंत,युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर,शिवसेना तालुकाप्रमुख बाळु परब,अजित सावंत,वेंगुर्ला महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले,उपनगराध्यक्ष वेंगुर्ला अस्मिता राऊळ,मंजुषा आरोलकर,डेलिन डिसोजा,संजय गावडे शितल साळगावकर,नंदिनी धानजी,नामदेव राणे,स्नेहा राणे,योगेश नाईक,गुणाजी गावडे,सोनू गवस,पंकज शिरसाट,रोहित पडवळ,आदित्य आरेकर ,समीर नाईक,नितिष कुडतरकर,दादा सारंग,प्रसाद बागाईतकर ,स्नेहा साळगावकर आदींचा समावेश आहे.त्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होणार आहे.

11

4